मँगो आइसक्रीम मराठी रेसिपी

मँगो आइसक्रीम मराठी रेसिपी
साहित्य:
 थंडगार 2 कप आंब्याचा रस , थंडगार ,1/2 कप पिठी साखर ,1 कप हेवी व्हिपींग क्रिम, वेलचीपूड (ऐच्छिक) टीप:  खवाही आईसक्रिममध्ये वापरू शकतो(भाजलेला), वरील प्रमाणासाठी 1/2 ते 1 कप खवा वापरावा, बदाम पिस्ताही आपण घालू शकतो , 3-4 वेळा मिक्सरमध्ये मिश्रण बारीक केल्यावर शेवटी जेव्हा आईसक्रिम सेट करण्यास ठेवाल त्यावेळी आंब्याचे साल काढून बारीक तुकडे मिश्रणात घालू शकता, छान लागतात.
कृती :
1) एक मध्यम आकाराचे खोलगट काचेचा बाउल  घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा. गार झालेले काचेचे बाउल घेऊन त्यात गार व्हिपींग क्रिम घाला आणि हॅण्ड मिक्सरने जास्त स्पिडवर फेटा.
2) क्रिम थोडे फ्लफी व्हायला लागले कि २ ते ३ वेळा साखर घालून फेटत राहा. क्रिम व्यवस्थित फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. गरजेपेक्षा जास्त फेटल्याने क्रिम पिवळसर होवून त्यातील स्निग्धांश विलग होतो.
3) आता यामध्ये थंड आंब्याचा रस घालावा. वेलचीपूड घालणार असल्यास आता घाला. निट मिक्स करा.
4) जर आईसक्रिम मशिन नसेल तर हे मिश्रण फ्रिझर सेफ प्लास्टिक किंवा फ्रिझर सेफ मेटलच्या भांड्यात घाला (बेकिंगसाठी जे मेटलचे भांडे वापरतात तेही चालेल). साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरमधून काढा. आईसक्रिम भांड्याच्या कडेने सुटेस्तोवर थांबा.
5) नंतर हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये काही मिनीटे ब्लेंड करा. परत भांड्यात ओतून १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. २ तासांनी परत मिक्सरमध्ये फिरवा. असे किमान ३ ते ४ वेळा करा म्हणजे आईसक्रिम चांगले व स्मूथ लागेल. 
إرسال تعليق (0)
أحدث أقدم