फिश बिर्याणी मराठी रेसिपी

फिश बिर्याणी

साहित्य :

माश्याचे ५-६मोठे जाड तुकडे ( शक्यतो सुरमई, सामन असा घट्ट मासा घ्यावा ) . पातळ तुकडे असतील तर खिमा होईल. •  दहा ते बारा मोठ्या ताज्या कोलंब्या ( सालं आणी काळा धागा काढून टाकावा. ) •मासे मुरवण्यासाठी :- •  एक छोटा चमचा हळद •दोन छोटा चमचा लाल मिरचीपूड •  एक छोटा चमचा बिर्याणी मसाला •  अर्धे लिंबू •  एक छोटा चमचा तेल •  चवीनुसार मीठ • मसाल्या साठी :- • पाच ते सहा कढिपत्ता पाने • एक कप दही •  अर्धा कप बारीक चिरलेली कोथींबीर • पाव कप बारीक चिरलेला पुदिना • तीन ते चार हिरव्या मिरच्या •  एक छोटा चमचा बिर्याणी मसाला •एक मोठा चमचा आल-लसूण पेस्ट •एक चमचा तेल •बिर्याणी भातासाठी :- •  दोन कप बासमती तांदूळ ( ३० मिनीटे भिजववून निथळत ठेवावा) • सात ते आठ काळीमिर्या • तीन ते चार लवंगा • एक तमालपत्र •  दीड इंच दालचिनी काडी • एक चमचा शहाजीरे • एक छोटा चमचा बिर्याणी मसाला • चविपुरते मीठ


कृती :

• माश्याचे तुकडे-कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याला १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा लाल मिरचीपूड, १ छोटा चमचा बिर्याणी मसाला, १/२ लिंबू, १ छोटा चमचा तेल, चवीनुसार मीठ लावून ३० मिनीटे लावून ठेवावे • मासे मुरत असताना एकिकडे भाताची तयारी चालू करावी. भाताच्या दुप्पट पाणी उकळत ठेवावे. एका जाड  भांड्यात थोड्या तेलात सगळा खडा गरम मसाला ( ७-८ काळीमिर्या, ३-४ लवंगा, १ तमालपत्र, १" दालचिनी काडी, १ चमचा शहाजीरे ) भाजावे. त्यात भिजवून निथळत ठेवलेले तांदूळ १-२ मिनीटे हलक्या आचेवर परतून घ्या. • नंतर त्यात उकळवलेले पाणी, चविपुरता मीठ आणी १ छोटा चमचा बिर्याणी मसाला टाकून भात शिजवावा. पूर्ण शुजवू नये. १ कणी असताना काढून ताटात मोकळा पसरून घ्यावा. ( जर मायक्रोवेव्ह असेल तर त्यातसुद्धा भात छान मोकळा होतो. ) भात शिजत असताना जाड बुडाच्या भांड्यात थोड्या तेलात कोलंबी आणी मासे तळून घ्यावेत. पूर्ण शिजवू नयेत. • दोन्ही बाजूनी परतून घ्यावेत व प्लेट वर हलक्या हाताने काढून ठेवावेत. आता या उरलेल्या तेलात मसाल्याचे साहित्य ( ५-६ कढिपत्ता पाने, १ कप दही, १/२ कप बारीक चिरलेली कोथींबीर, १/४ कप बारीक चिरलेला पुदिना, ३-४ हिरव्या मिरच्या मधे उभ्या चीरून, १ छोटा चमचा बिर्याणी मसाला, १ मोठा चमचा आल-लसूण पेस्ट ) घालावे. आणि २-३ मिनीटे शिजवावे. • आता हे शिजवलेले अर्धे मिश्रण माश्यांच्या तळलेल्या तुकड्यांवर घालावे. उरलेल्या मसाल्यात थोडे पाणी घालून मोकळा केलेला भात पसरून घालावा. वरून माश्याचे तुकडे पसरून टाकावे. • वरून झाकण ठेवावे व मंद आचेवर ५-१० मिनीटे भात होईपर्यंत शिजवावे. रायत्याबरोबर गरमा गरम वाढावे. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post