आलू पराठा मराठी रेसिपी

आलू पराठा
साहित्य :
• २ वाट्या कणीक • अर्धा चमचा मीठ • २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन • ३ मोठे उकडलेले बटाटे • ७-८ लसूण पाकळ्या • ५-६ हिरव्या मिरच्या वाटून • १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर • मीठ • साखर चवीनूसार • पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप

कृती :
• कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी. • बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. • किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा. • भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत. • कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा. • जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post