चिकन बिर्याणी रेसिपी । how to make chicken biryani in Marathi

     ६७५ ग्रा. चिकन तुकडे

    १॥ कप बासमती तांदूळ

    २ मोठे चमचे तेल

    १ कापलेला कांदा

    २ कांडी लसूण सोललेली

    १ हिरवी मिरची कापलेली

    १ तुकडा आले कापलेले

    २ चमचे चिकन मसाला

    १ चमचा मीठ चवीनुसार

    १/२ चमचा गरम मसाला

    ३ कापलेले टोमॅटो

    १/२ चमचा हळद

    २ तेजपत्ते

    ४ छोटी वेलची

    ४ लवंग

    १ चमचा केसर


तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीट फ्राय करावे चिकन टाकावे व ३ मिनीट फ्राय करावे.


चिकन मसाला मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकुन ३-४ मिनीट अजुन भाजावे नंतर उतरवुन एका बाजुला ठेवावे.


एका दुसर्‍या कढईत तांदूळ, ३ कप पाणी हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी सुकेपर्यंत शिजवावे. शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवावे आणि कमी गॅसवर ८-१० मिनीट ठेवावे गॅस बंद करावा व ८-१० मिनीटानंतर खावे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post